हेमंता, आल्यासरशी थोडा थांबशील का?
विसावा घेत, पानगळ जरा लांबवशील का?
राहू दे हवेतला गारवा
नको होऊ देऊस गारठा
कवाडं उघडायला लावू नकोस
आणखी आठवणी गोठवायला लावू नकोस
शिशिराने म्हणे पाठवलाय खलिता
करीन म्हणतो आसमंत रिता
लागू दे त्याला अनंत चकवा
येऊ दे वसंत, येऊ दे फुलोरा, येऊ दे फुलोरा ....
विसावा घेत, पानगळ जरा लांबवशील का?
राहू दे हवेतला गारवा
नको होऊ देऊस गारठा
कवाडं उघडायला लावू नकोस
आणखी आठवणी गोठवायला लावू नकोस
शिशिराने म्हणे पाठवलाय खलिता
करीन म्हणतो आसमंत रिता
लागू दे त्याला अनंत चकवा
येऊ दे वसंत, येऊ दे फुलोरा, येऊ दे फुलोरा ....
-- हेमंत ऋतुच्या शुभेच्छा !!
No comments:
Post a Comment